बांगलादेश,
Ripon Saha death Bangladesh बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यातील सदर उपजिल्ह्यात शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे स्थानिक हिंदू समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे एक ३० वर्षीय हिंदू तरुण रिपन साहा याची जाणूनबुजून गाडीने चिरडून हत्या करण्यात आली. सदर घटना राजबारी जिल्ह्यातील गोलंडा मोरे येथील करीम फिलिंग स्टेशनवर घडली, जेथे रिपन साहा काम करत होता.
घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनुसार, एक वाहनचालक करीम फिलिंग स्टेशनवर इंधन भरण्यास आला होता. त्याने इंधन भरले, परंतु पैसे देण्यास नकार दिला. रिपन साहा याने त्याला पैसे देण्याची विनंती केली आणि थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावर संतापलेल्या आरोपी चालकाने रिपनच्या अंगावर गाडी घातली. या भीषण अपघातात रिपन साहा याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर Ripon Saha death Bangladesh पोलिसांनी तत्परता दाखवली आणि गाडी जप्त केली. आरोपी वाहनचालक कमाल हुसेन याला बानिभान निपारा गावातून ताब्यात घेतले. तसेच गाडीचा मालक अबुल हाशेम यालाही अटक करण्यात आली. हाशेम हा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या राजबारी जिल्हा युनिटचा माजी कोषाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हा अपघात हत्या आहे. आरोपीने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा पीडित तरुण गाडीसमोर उभा होता, त्यातच चालकाने त्याला धडक दिली आणि पळून गेला," असे खोंडकर झियाउर रहमान, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
बांगलादेशातील अल्पसंख्याक Ripon Saha death Bangladesh हिंदू समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाढ झाली आहे. याच आठवड्यात बांगलादेशातील दागनभुईयान उपजिल्ह्यात एक अन्य हिंदू तरुण समीर दास याची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह एका शेतात आढळून आला. अशा घटनांच्या वाढत्या प्रमाणामुळे स्थानिक हिंदू समुदायात चिंता आणि भय वाढले आहे.भारतीय सरकारने या घटनांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. "बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या सुरक्षेसाठी बांगलादेश सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत," अशी मागणी भारताने केली आहे. मानवाधिकार संघटनांच्या मते, बांगलादेशमधील सध्याच्या राजकीय अस्थिरतेमुळे अल्पसंख्याक हिंदू समुदायाला असुरक्षितता वाढली आहे आणि त्यांच्या विरोधात होणारे लक्ष्यित हल्ले ही एक मोठी चिंता बनली आहे.यासोबतच, बांगलादेशातील सरकारला या प्रकारच्या अत्याचारांवर तात्काळ नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे, अन्यथा स्थानिक हिंदू समुदायाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.