रंगभूमीचा आत्मा हरवला !

वत्सला पोलकमवार यांनी व्यक्त केली तळमळ

    दिनांक :27-Mar-2024
Total Views |
रंगभूमी नागपूर,
soul theater २२ मार्चचा आत्मा हरवला आहे. निर्जिव शरीर सजून फिरत आहे. पूर्ण समर्पित भावनेने शोध घेतल्यास तो आत्मा गवसणे अवघड नाही, अशी तळमळ ज्येष्ठ रंगकर्मी वत्सला पोलकमवार यांनी व्यक्त केली. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त तरुण भारत प्रतिनिधीशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. वयाच्या १४ व्या वर्षी हिंदी नाटकातून सुरु झालेला वत्सला पोलकमवार यांचा नाट्यप्रवास सहजसुलभ नव्हता. तरिही आयुष्यातील अनेक चढउतार त्यांनी लिलया पेलले.

soul of theter 
 
त्याला कारण होते नाटकाचे अननुभूत वेड, त्यासाठी कोसो दूर पायपीट करण्याचे झपाटलेपण, परकाया प्रवेशाची प्रचंड उर्मी आणि संहीतेतील व्यक्तीरेखा साकारताना मिळणारा उर्जादायी आनंद. पंधराव्या वर्षी त्या झाडीपट्टीतील वेगवेगळ्या भूमिकांमध्ये रमल्या. मदन गडकरी यांच्या रसिकरंजन तर्फे सादर करण्यात आलेल्या ‘पोहा चालला महादेवाङ्क या नाटकाने त्यांच्या कारकिर्दीला सुवर्णकलाटणी दिली. महाराष्ट्रभर नाव झाले. नटसम्राट, वस्त्रहरण, रायबाई भुलाबाई ही त्यांची गाजलेली नाटके. तर कौती, कावेरी या अखंड समाधान देणाèया अजरामर भूमिका. कुठल्याही भूमिकेत झोकून काम करणाèया पिढीतील कलाकार असल्याने वत्सला यांना आजची रंगभूमी काहीशी बेचैन करते. तेव्हा कलावंतांचे कलेवर प्रेम असायचे, निष्ठा होती. आता यांत्रिकपणा आला आहे. तालमींसाठी मनमोकळा वेळ नाही, नवीन मुलं बुध्दीमान आहे पण लगेच मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतात, तेव्हा आम्हाला असे करायची मुभा नव्हती. भूमिका जिवंत करताना दिग्दर्शकाला अंगावर घातलेले स्वेटरही चालत नसे इतके भूमिकेत एकजीव व्हावे लागे. सध्या एकाग्रचित्त वृत्तीचा अभाव दिसतो. अर्थात या पिढीपुढील आव्हाने निराळी आहेत. त्यानुसार त्यांना पटकन प्रसिध्दी, पैसा हवा असतो.soul theater केवळ रसिकाश्रय कलात्मक अभिव्यक्तीने आयुष्य निभणार नाही हे त्यांना माहिती असावे. आम्ही पदरचे पैसे खर्च करुन नाटक करीत असू. एकांकिका, स्पर्धा, महानाट्याचा काळ आहे पण त्यातील हालचालींपेक्षा आतून उमलून येणाèया मुरलेल्या भूमिकेचा हर्ष अलौकिक असतो. नाटकासाठी नाटक नको तर समाजाच्या देण्यासाठी नाटक करा. माझ्यातला कलावंत अजूनही उपाशी आहे, अद्यापही सर्वोत्तम भूमिकेची प्रतिक्षा आहे, असे वत्सला पोलकमवार म्हणाल्या.  नागपुरातील 'त्या' नराधामाची फाशी कायम!

प्रायोगिक नाटकांची गरज : प्रभाकर आंबोणे
नाटकासाठी पूर्ण समर्पित असावे, लेखकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यावे, सामाजिक प्रश्न मांडणारे प्रायोगिक नाटक यावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर आंबोणे यांनी व्यक्त केली.