बोहल्यावर चढण्याआधी 20 नौरोबांनी बजावला हक्क

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Wardha Constituency : वर्धा लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया आज 26 रोजी पार पडली. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू असलेली या प्रक्रियेत नवरदेवांनी रंगत आणली. आज जिल्ह्यातील विविध गावांतील जवळपास 20 नौरोबांनी आधी लगीन लोकशाहीचे नंतर आमचे असा संदेश देत सकाळी मतदानाचा हक्क बजावून नववधूच्या मांडवात हजर झाले.
 
fjskfjd
 
वर्‍हाड निघाले मतदानाला
 
 
पुलगाव : नजीकच्या विटाळा गावातील बाबूराव डाहे यांचे चिरंजीव गौरव याचा विवाह आज 26 रोजी भद्रावती येथे आयोजित होता. मतदानाच्या दिवशी विवाह असल्यामुळे गावातील सर्व मतदार मतदान न करताच विवाहाला जाणार होते. परंतु, डाहे परिवाराला सर्व मतदारांचे मतदान करूनच विवाहासाठी निघण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत डाहे परिवाराने अरविंद हलमारे, मनोज राऊत, सतीश तांबुसकर यांच्या सहकार्याने संपूर्ण गावातील मतदारांचे मतदान केल्यानंतरच वर्‍हाड रवाना झाले. महिलेच्या नांवावर अन्य कोणी केले मतदान!
शुभमही आला
 
 
 
सिंदी (रेल्वे) : येथील नगर विद्यालयाच्या मतदान केंद्रावर 84 वर्षांच्या कुसूम भन्साली यांनी मुलांच्या मदतीने सर्वप्रथम मतदान केले. त्याच मतदान केंद्रावर शुभम वडांद्रे या नवरदेवाने मतदान केले. येथील सर्वच मतदान केंद्रावर सकाळी मोठी गर्दी होती.
 
हिंगणघाट तालुक्यातील फुकटा येथील 312 मतदान केंद्रावर युवराज हारगोडे, फत्तेपूर येथील अमोल मांढरे, सालोड येथील भास्कर उईके, दहेगाव मुस्तफा येथील धनराज मुडे यांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. पवनार येथील मंगेश याने घोड्यावर बसुन मतदान केंद्र गाठले. यावेळी मतदान करायला चला असे आवाहनही त्याने केले.