इतस्ततः
millets year 2023-uno भारताच्या पुढाकारातून संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक स्तरावर २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले. यातूनच परंपरागत स्वरूपात पौष्टिक, आरोग्यदायी व सहजपणे उपलब्ध असणाऱ्या श्रीधान्य उत्पादन सेवन मोहिमेला वेगळी गती तर मिळालीच; शिवाय संयुक्त राष्ट्रातर्फे निर्धारित २०३० पर्यंत जगाला भूकमुक्त करण्याच्या उद्दिष्टाला वेगळी दिशा मिळाली आहे. millets year 2023-uno भारतातील भरड धान्याचे परंपरागत स्वरूपातील पौष्टिक गुण सर्वमान्य आहेत. या सर्वमान्यतेवर जागतिक स्तरावरील पसंती-मान्यतेची मोहर उमटली, ती दिल्लीतील जागतिक जी-२० परिषदेतील भरड धान्यांसह करण्यात आलेल्या विशेष खाद्यान्न पद्धतीसह केलेल्या आयोजनामुळे. जी-२० परिषदेदरम्यान असे आवर्जून दाखविण्यात व सांगण्यात आले की, जागतिक स्तरावर केवळ भारतातच विविध प्रदेशातील भौगोलिक स्थिती, प्रादेशिक हवामान, जैवविविधता व परंपरागत व विविधतापूर्ण शेती पद्धतींमुळे भरड धान्य मोठ्या स्वरूपात उत्पादित तर होतेच; millets year 2023-uno शिवाय भारत आता भरड धान्याच्या जागतिक निर्यातीसाठीसुद्धा सक्षम बनला आहे. या वस्तुस्थितीला जी-२० संमेलनामुळे जागतिक मान्यता व दाद मिळाली आहे.
भरड धान्याच्या संदर्भात सद्यःस्थितीतील आकडेवारी व वस्तुस्थितीसह सांगायचे म्हणजे, आज भारत भरड धान्यांच्या संदर्भात जागतिक स्तरावर ८० टक्के तर आशियाई स्तरावर सुमारे २० टक्के भरड धान्याचे उत्पादन करतो, हे सिद्ध झाले आहे. याशिवाय भरड धान्याच्या निर्यातीच्या संदर्भात सांगायचे म्हणजे, भारताचा क्रम जगातील पहिल्या पाच देशांमध्ये लागतो. millets year 2023-uno भारत आणि भारतीयांच्या संदर्भात ही मोठीच जमेची बाजू म्हणायला हवी. सरकार आणि सरकारी स्तरावरील प्रयत्न आणि प्रोत्साहनामुळे भरड धान्याचा उपयोग वाढीस लागला. यातून या प्रकारच्या धान्याची लागवड व उत्पादनदेखील वाढीस लागले. याचे प्रत्यंतर देशांतर्गतच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरदेखील येऊ लागले. यासंदर्भातील उल्लेखनीय बाब म्हणजे, २०१९-२० या आर्थिक वर्षात भरड धान्याची जी निर्यात ३० दशलक्ष डॉलर्सची होती, या निर्यातीत घवघवीत वाढ होऊन २०२१-२२ मध्ये ६४ दक्षलक्ष डॉलर्स म्हणजेच दुपटीहून अधिक झाली. millets year 2023-uno यावर्षी आता संयुक्त राष्ट्र संघानेच अधिकृतपणे व जागतिक स्तरावर आंतराष्ट्रीय भरड धान्य वर्ष घोषित केल्याने त्याची निर्यात व उलाढाल दोन्ही निश्चितपणे वाढणार आहे.
तसे पाहता, परंपरागत स्वरूपात भरड धान्यामुळे कृषी उत्पादनापासून त्यावर विविध प्रकारे विक्री, संशोधन व विपणन व्यवस्थापन या क्षेत्रांत नोकरी-रोजगार-स्वयंरोजगार इत्यादी संधी मोठ्या प्रमाणात मिळू लागल्या आहेत. केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सदस्य व या विषयातील तज्ज्ञ प्रा. रमेश चंद्र यांनी भारतातील भरड धान्य चळवळ या अभ्यासपूर्ण पुस्तकात नमूद केल्यानुसार, भारत आणि भारतीयच नव्हे, तर जागतिक स्तरावर भारतातील भरड धान्य हे अनेक अर्थांनी वरदान ठरणारे आहे. millets year 2023-uno खाद्यान्नातून पौष्टिक अन्न ही बाब आता जगापुढे आली असून भारतातील भरड धान्याचा आबालवृद्धापर्यंत सर्वांसाठी कसा उपयोग होऊ शकतो, यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते, देशांतर्गत काही क्षेत्रांत असणाऱ्या कुपोषित बालकांपासून शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह खाद्य ग्रामीणच नव्हे, तर शहरी नागरिकांपर्यंत भरड धान्य हा भरपूर प्रथिने देणारा सकस, सरळ व स्वस्त आहार सिद्ध झाला आहे. यातूनच ग्रामीण व निमशहरी भागात अनेक रोजगार-स्वयंरोजगार स्वरूपात उपलब्ध झालेच; शिवाय शेतकऱ्यांना पूरक शेतकी उत्पन्नाचा आर्थिक स्रोत उपलब्ध झाला.
millets year 2023-uno मध्यंतरीच्या काळात वाढते शहरीकरण, शेती आणि कृषी उत्पादनातील बदल, परंपरागत धान्य लागवडीकडे वळलेली पाठ, नवी वहिवाट इत्यादींमुळे श्रीधान्य स्वरूपात असणारे भरड धान्य स्वाभाविकपणे माघारले गेले. पाश्चिमात्यच नव्हे, तर तथाकथित प्रगत कृषी उत्पादनांचा बोलबाला झाला. त्यामुळे ग्रामीणच नव्हे, तर निमशहरी क्षेत्रात भरड धान्यावर आधारित लघु वा कुटिरोद्योगांना जवळ-जवळ घरघर लागली. याचा परिणाम भरड धान्य संशोधन व त्याच्या पौष्टिकतेसह विविध संशोधनावर विपरीत स्वरूपात झाला. millets year 2023-uno भरड धान्याच्या कमी वा नगण्य स्वरूपातील वापराचा नकारात्मक ग्रामीण व गरिबांसह जनसामान्यांच्या आरोग्यावर झाला. संशोधनातून सिद्ध झालेली बाब म्हणजे, भरड धान्यात भाजीपाल्याच्या बदल्यात व प्रसंगी त्याहून अधिक पौष्टिक सत्त्व असतात व त्याचा फायदा सर्वसामान्यापासून सर्वांना होत असतो. शेतकरी वा कृषी उत्पादनांच्या संदर्भात सांगायचे झाल्यास संशोधनाअंती असे सिद्ध झाले आहे की, अगदी कोरडवाहू जमिनीतही भरड धान्याची लागवड-उत्पादनासाठी पाण्याचा वापर जवळ-जवळ निम्मा असतो. millets year 2023-uno याशिवाय भरड धान्यावर शेतीतील विविध कीड आणि कीटकांचा प्रभाव-परिणाम होत नसल्याने त्यातील सत्त्व कायम राहते. या पृष्ठभूमीवर नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेमध्ये केंद्र सरकारने ‘एक जग, एक कुटुंब, एक भविष्य' या जी-२० धोरणानुसार व संयुक्त राष्ट्र संघाच्या यावर्षीच्या भरड धान्य वर्षानुसार भरड धान्याचा नेमका व कल्पक वापर खाद्यान्नाच्या संदर्भात केला.
यामध्ये प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, नाचणी, कुटकी, रागी इत्यादी धान्यांपासून विशेष प्रयोग केला गेला व त्याला जागतिक स्तरावरील प्रतिनिधी, पुढा-यांकडून चांगला प्रतिसाद लाभला. भरड धान्याचे महत्त्व यानिमित्ताने सर्वदूर समजले, त्याचे उत्पादन करणाèया विशेषतः ग्रामीण महिलांना मोठा वाव यानिमित्ताने गावापासून जी-२० पर्यंत मिळाला. millets year 2023-uno भरड धान्याच्या उत्पादन-वापराला अधिक चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ‘मिलेटस् अॅण्ड अदर अॅन्शेंट ग्रेन इंटरनॅशनल रिसर्च इनिशिएटिव्ह' म्हणजेच ‘महर्षी' या नव्या ग्रामीण व कृषीवर आधारित उपक्रमाची सुरुवात केली आहे. या नव्या उपक्रमांतर्गत भरड धान्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, शैक्षणिक वा संशोधन संस्था व सरकारी स्तरावरील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उपक्रम आणि प्रयत्न यांची सांगड घातली जाणार आहे. भारत भरड धान्य लागवड-उत्पादनाच्या संदर्भात आधीच अग्रणी असल्याने त्याचा सहज व मोठा लाभ भारत आणि भारतीयांना होणार आहे. millets year 2023-uno त्यातही ग्रामीण व शेतकरी यांच्यासह कृषी उत्पादन व प्रक्रिया क्षेत्रातील कुटिरोद्योग व महिला बचत वा स्वयंसहाय्यता गट सदस्यांचा त्यांच्या प्रयत्न आणि प्रगतीची नवी व आशादायक दिशा यानिमित्ताने लाभली आहे.
९८२२८४७८८६