इतस्ततः
- दत्तात्रेय अंबुलकर
selection of employees नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यानंतर उद्योग-व्यवसाय क्षेत्र नव्याने स्थिरावले आहे. उत्पादन क्षेत्रासह मूलभूत सुविधा व त्याशिवाय सेवा क्षेत्राने या काळात सकारात्मक व्यवसायवाढीची सलामी दिली आहे. यामुळे एकूणच व्यवसायवाढीला विश्वासाचे पाठबळ मिळाले आहे. प्रस्तावित व्यवसायाची पूर्तता करण्यासाठी संबंधित कंपन्यांमध्ये विविध स्तरांवर व व्यावसायिक गरजांनुरूप कर्मचा-यांची निवड-नेमणूक सुरू केली आहे. selection of employees नव्याने केलेल्या रोजगार सर्वेक्षणानुसार, कार्यालयीन वा संबंधित कामकाज करणा-या कर्मचा-यांच्या जागांमध्ये प्रदीर्घ काळानंतर सुमारे १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. अर्थात, जागांची ही संख्या व टक्केवारी कंपनी आणि त्यांच्या व्यावसायिक गरजांनुरूप वेगळी असली, तरी त्यामुळे नजीकच्या भविष्यात नोकरी-रोजगार संधींच्या संदर्भातील कल अवश्य स्पष्ट होतो. selection of employees तुलनेने अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान यावर आधारित कर्मचा-यांना सध्या तरी कमी मागणी आहे.
selection of employees कर्मचारी निवड क्षेत्रात प्रामुख्याने काम करणा-या एक्स्फो कंपनीच्या विशेषज्ज्ञांनी यासंदर्भात केलेल्या अभ्यासानुसार, दरमहा कर्मचा-यांच्या निवड-नेमणुकीचे प्रमाण दरमहा सरासरी १५ टक्क्यांनी वाढत आहे. हे प्रमाण अर्थातच सर्व प्रकारच्या उद्योग-व्यवसायाचे परिचायक आहे. मासिक रोजगार संधींच्या आकडेवारीच्या संदर्भात सांगायचे म्हणजे, दोन महिन्यांतील तुलनात्मक आकडेवारी २ लाख, २५ हजारांपासून २ लाख ६० हजारांपर्यंत वाढलेली दिसून येते. अर्थात, आधीच्या उपलब्ध झालेल्या रोजगार संधी व कर्मचा-यांच्या निवडीच्या तुलनेत हे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमीच होते. selection of employees उद्योग क्षेत्रशः सांगायचे म्हणजे सद्यःस्थितीत रिटेल, ग्राहकोपयोगी उत्पादने, पर्यटन व्यवसाय यांसारख्या क्षेत्रातील रोजगार संधींमध्ये दरमहा सरासरी १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचे परिणाम कर्मचा-यांच्या निवडीमध्ये सक्रियपणे होत असल्याचे एक्स्फोच्या अभ्यास-अहवालात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे, हे विशेष!
हे पण वाचा ... नागपूर मनपात निघणार मोठी पदभरती!
दरम्यान, बदलता काळ व वाढत्या व्यावसायिक गरजांपोटी विविध स्तरांवर कर्मचा-यांची निवड करताना विविध कंपन्या अधिकाधिक चौकस व चोखंदळ झाल्याचे दिसून येते. selection of employees त्याचे परिणामही दिसून येत आहेत. याची जाणीव आता कंपनी, अधिकारी व अर्जदार-उमेदवार या उभयतांना झालेली दिसून येते. बदलत्या स्थितिनुरूप यासंदर्भातील वस्तुस्थिती अधिकाधिक स्पष्ट होत आहे. यासंदर्भात झालेला मुख्य बदल म्हणजे, आता कंपन्या उमेदवारांची निवड करताना त्यांची शैक्षणिक पात्रता व संबंधित कामाचा प्रत्यक्ष अनुभव याच्याच जोडीला त्याची मानसिकता व कार्यशैलीवर अधिक भर देत आहेत. selection of employees यासंदर्भात qलक्ड ईनने केलेल्या सर्वेक्षणानुसार, लहान-मोठ्या अशा विविध कंपन्या कर्मचा-यांची निवड करताना आता त्यांची मानसिकता व कार्यशैली यावर कटाक्षाने भर देत आहेत. असे करण्यामागचे मुख्य व महत्त्वाचे कारण म्हणजे, अर्जदार त्यांची शैक्षणिक पात्रता व संबंधित कामाचा अनुभव त्यांच्या अर्जात नमूद करतात. विविध प्रकारच्या मुलाखती व संभाषणांतून त्याची पडताळणी घेतली जाऊ शकते. selection of employees मात्र, त्यातून उमेदवारांची कामाच्या संदर्भात व स्वभावविषयक मानसिकता लक्षात येते, असे नाही.
हीच बाब निवड झालेल्या उमेदवाराने कामावर रुजू झाल्यावर त्याच्याकडून अपेक्षित प्रकारच्या कामाची व कार्यपद्धतीची पूर्तता होऊ शकेल अथवा नाही, हे स्पष्ट करू शकत नाही. लिंक्ड ईनद्वारा यासंदर्भात प्रकाशित अभ्यासपूर्ण आकडेवारीनुसार, कर्मचा-यांची निवडपूर्व चाचणीद्वारे त्यांच्या मानसिकतेची पडताळणी आवर्जून केली जाते. selection of employees याच अभ्यासात आढळून आलेली अन्य महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, मानसिकताविषयक चाचणीद्वारा ज्या उमेदवारांची निवड केली गेली, असे उमेदवार केवळ मुलाखत-चर्चेद्वारा निवड केलेल्या उमेदवारांपेक्षा अधिक कार्यक्षम व उत्पादक असतात. यामुळेच या विशेष चाचणीबद्दल कर्मचारी-व्यवस्थापन आता विशेष आग्रही होऊ लागले आहे. केवळ पात्रताधारक नव्हे, तर गुणवत्ताप्राप्त कर्मचारी मिळण्याचे दुहेरी फायदे यानिमित्ताने होऊ लागले आहेत. selection of employees कर्मचारी कौशल्यविषयक लिंक्ड ईनद्वारा प्रकाशित अन्य अभ्यासानुसार बदलती व्यावसायिक स्थिती भारतीय कंपन्यांच्या वाढत्या गरजा यामध्ये तुलनेने झपाट्याने व मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत.
यासंदर्भात प्रकाशित आकडेवारीनुसार, २०१५ च्या तुलनेत नव्या कर्मचा-यांच्या कौशल्यविषयक गरजा सुमारे २९ टक्क्यांनी वाढल्या असून २०२५ पर्यंत कर्मचा-यांच्या सध्याच्या कौशल्य टक्केवारीत सुमारे ४८ टक्के नवे बदल होणे अपेक्षित आहे. selection of employees मुख्य म्हणजे, जागतिक स्तरावर कर्मचारी कौशल्यांच्या बदलांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांच्या कर्मचारी कौशल्यांमध्ये अपेक्षित बदल तुलनेने मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. भारतीय कंपन्यांच्या कौशल्यविषयक गरजांचे विश्लेषण केलेल्या विश्लेषणपर अभ्यासानुसार, भारतात तेल कंपन्या, गॅस उत्पादन, खाणकाम या उद्योग क्षेत्रातील कर्मचा-यांमध्ये सुमारे ९.७ टक्के कौशल्यवाढ झाली आहे. वाहन वाहतूक, मालाची ने-आण वस्तू पुरवठा क्षेत्रात हेच प्रमाण १०.३ टक्के झाले आहे, तर रुग्णसेवा व पर्यटन क्षेत्रातील कर्मचारी कौशल्यवाढीचे प्रमाण सुमारे ११.३ टक्के दिसून आले आहे. selection of employees असे होण्यामागे कर्मचारी निवड करताना कंपन्या सध्या शैक्षणिक पात्रताधारक असण्याबरोबरच कौशल्यपात्र उमेदवार असल्यावर भर दिला जात आहे. यातूनच उमेदवारांची मुलाखत-निवड करताना कर्मचारी निवडसंदर्भात आता कौशल्य प्रथम ही बाब अधोरेखित होत आहे.
९८२२८४७८८६