संजय सिंह आणि भगवंत मान यांना केजरीवालांना भेटता येणार नाही!

10 Apr 2024 10:45:53
नवी दिल्ली,
Mann not meet Kejriwal पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आपचे खासदार संजय सिंह आज म्हणजेच बुधवारी तुरुंगात अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊ शकणार नाहीत. तिहार तुरुंगात सुरक्षेचे कारण असल्याचे आपने म्हटले आहे. आता तिहार जेल प्रशासन भेटीच्या नव्या तारखेची माहिती देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंग प्रशासनाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीसाठी पत्र मिळाले होते. यानंतर आज म्हणजेच बुधवारी संजय सिंह आणि भगवंत मान तुरुंगात केजरीवाल यांची भेट घेतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, कारागृह प्रशासनाने त्यास परवानगी दिली नाही. नाना पटोलेंच्या गाडीचा अपघात
 विदर्भ-मराठवाड्यात पुन्हा बसणार अवकाळीचा तडाखा  
 
sanhay
 
  अरविंद केजरीवालांनी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव   तुरुंगाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, आज तिहारचे डीआयजी या पत्राचे उत्तर देतील. डीआयजीच्या उत्तरामुळे सुरक्षेची माहिती मिळेल आणि मीटिंगसाठी काही तारखा सुचविल्या जातील. संजय सिंह आणि सीएम भगवंत मान यांची इच्छा असल्यास ते त्या तारखांना सीएम केजरीवाल यांची भेट घेऊ शकतात. Mann not meet Kejriwal याआधी मंगळवारी सीएम केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी तिहार तुरुंगात जाऊन त्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांचे पीए विभव कुमार हेही त्यांच्यासोबत होते. सीएम केजरीवाल तिहार तुरुंग क्रमांक 5 मध्ये बंद आहेत. तिहारला जाताना अरविंद केजरीवाल यांनी त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल, त्यांची दोन्ही मुले, आप नेते संदीप पाठक आणि तुरुंगात भेटलेल्यांमध्ये त्यांचे स्वीय सचिव यांची नावे लिहिली होती. आता या यादीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.
Powered By Sangraha 9.0