सलमानला इशारा...हा तर फक्त ट्रेलर होता !

14 Apr 2024 16:05:51
मुंबई,
 
 
Salman-Bishnoi-Dawood बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी अपडेट समोर आली आहे. लॉरेन्स बिश्णोईचा भाऊ अनमोल बिश्णोई याने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. Salman-Bishnoi-Dawood अनमोल बिश्णोईच्या फेसबुकवरील व्हायरल पोस्टनुसार, हा हल्ला लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्णोईने करवला आहे. व्हायरल माहितीनुसार, अमेरिकेत राहणाऱ्या गँगस्टर अनमोल बिश्णोईने सलमानच्या घरावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेणारी पोस्ट लिहिली आहे.Salman-Bishnoi-Dawood
 
 मुख्यमंत्र्यांनी केली सलमानची विचारपूस !
 
Salman-Bishnoi-Dawood
 
 
सलमान खानसह हे स्टार्स आहेत भीतीच्या छायेत   ‘आम्हाला शांतता हवी आहे. अत्याचाराच्या विरोधातील निर्णय जर लढून होणार असेल तर आम्ही लढायला तयार आहोत. सलमान खान, आम्ही तुला ट्रेलर दाखविण्यासाठी हा हल्ला केला आहे. आता तरी तू समज आणि आमच्या ताकदीचा, संयमाचा अंत बघू नको. हा पहिला आणि शेवटचा इशारा आहे. Salman-Bishnoi-Dawood यानंतरचा गोळीबार फक्त घरावर होणार नाही. आणि, ज्या दाऊद इब्राहीम आणि छोटा शकीलला तू देवाच्या जागी मानतोस, त्यांच्या नावाचे तर आम्ही दोन जनावरं पाळले आहेत. बाकी जास्त बोलण्याची मला सवय नाही,' ही पोस्ट त्याने फेसबुकवर केली आहे.  आता बँकिंग फसवणुकीला बसणार आळा !
 सलमान खानच्या घरावर फायरिंग...
 
 
Salman-Bishnoi-Dawood त्यात शेवटी लॉरेन्स बिश्णोई ग्रुपसोबतच गोल्डी बराड, काला जठेडी आणि रोहित गोदारा यांची नावं आहेत. गेल्या काही वर्षांपासून, गँगस्टर लॉरेन्स बिश्णोईच्या टोळीकडून अभिनेता सलमान खानला सतत धमक्या मिळत आहेत. रविवारी सकाळी दोन बाईकस्वार हल्लेखोरांनी सलमानच्या घरावर पाच राऊंड फायरींग केलं. Salman-Bishnoi-Dawood यासाठी, त्यांनी ७.६५ एमएम बोर पिस्तुलाचा वापर केला आहे. हल्लेखोरांनी हेल्मेट घातलेले होते. सामान्यत: घराच्या ज्या गॅलरीत सलमान उभा राहून, चाहत्यांचे अभिवादन स्विकारतो त्याच गॅलरीवर हा गोळीबार झाला असून, एका गोळीचा शेल सलमानच्या घराच्या आत सापडली आहे.  'रोहितला विकत घेण्यासाठी मी माझा जीव धोक्यात घालेन...',
Powered By Sangraha 9.0