तळेगांव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा

• सभेची तयारी जोरात

    दिनांक :18-Apr-2024
Total Views |
वर्धा,
Prime Minister Narendra Modi-Talegaon : भाजप-महायुतीचे वर्धा लोकसभेचे उमेदवार खा. रामदास तडस व अमरावती लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खा. नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट जाहीर सभा 19 एप्रिल रोजी दुपारी 03.00 वाजता चेतना ग्राऊंड, प्राथमिक आरोग्य केन्द्राजवळ, तळेगांव श्यामजी पंत येथे आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी येणारा लाखोंचा जनसमुदाय लक्षात घेता सभास्थळी विशाल सभामंडप व भव्य व्यासपीठ उभारण्यात येत आहे.  आठव्या दिवशी मतदान; कुठे जाऊ, कुणाला भेटू
 

jsfdj
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी तळेगाव सज्ज  शिवाय महिलांसाठी विशेष आसन व्यवस्था करण्यात येत असून उन्हाची तीव्रता लक्षात घेता सभास्थळी सुरक्षित आसरा व पाण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केन्द्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, मनसे नेते राजु उंबरकर सर्व लोकप्रतिनीधीसह, राज्यातील व जिल्ह्यातील अनेक भाजपा व महायुतीच्या मान्यवरांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
 
लोकप्रीय प्रधानमंत्री श्री. नरेद्रजी मोदी यांची जाहीर सभेची पुर्ण तयारी झालेली असुन वर्धा जिल्ह्यात तिस-यांदा येत आहेत त्यामुळे सभेत कोणतीही उणिव राहू नये सर्वंकश प्रयत्न सुरू आहेत. भाजपाचे पदाधिकारीही दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. सभेला वर्धा तसेच अमरावती लोकसभा मतदार संघातील मोर्शी, तिवसा विधानसभा मतदार संघातूनही जनसागर उसळणार आहे. तळेगावात एवढी मोठी सभा पहिल्यांदाच होत असल्याने तळेगाव नागरिकांना त्यांच्या भाषणाची उत्सृकता आहे. आज सभेची संपुर्ण तयारीची पाहणी खासदार रामदास तडस, आमदार श्री. दादाराव केचे, जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, वर्धा लोकसभा निवडणूक प्रमुख सुमीत वानखेडे यांनी पाहणी केली, यावेळी भाजपा व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.