विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त !

महावितरण अधिकारी, कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष

    दिनांक :18-Apr-2024
Total Views |
सडक अर्जुनी, 
insufficient electricity तालुक्यात काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे शेतीला मोठ्या प्रमाणावर पाणी लागत आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी शेतीसाठी वीजपुरवठा केला जात आहे. विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.तालुक्यात अनेक वर्षांपासून शेतीला रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जातो.  निवडणुकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज
 

565 
 
insufficient electricity अनेक ठिकाणी वारंवार बिघाड होणारी महावितरणची यंत्रणा आणि विजेचा लपंडाव यामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाल्याचे पहावयास मिळत आहे. विजेचा लपंडाव सुरू असल्याने कंपनीकडून देण्यात आलेल्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले आहेत. एकाच जनित्रावर अनेक जोडण्या व अधिकचा भार त्यामुळे जनित्रमध्ये वारंवार बिघाड येण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना रात्र जागून काढावी लागत आहे. विद्युतपुरवठा खंडित होण्यामुळे शेतीला पाणी देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. मुळात शेती पंपाला केवळ आठ तास पुरवठा केला जातो. मात्र, असे असले तरी या आठ तासांत वारंवार पुरवठा खंडित होत असल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. परिसरातील बहुतांश शेतकर्‍यांनी उन्हाळी धान पीक लागवड केली आहे. अनेक शेतकर्‍यांचे धान परिपक्वतेच्या अवस्थेत आहे. यावेळी पिकाला अधिक पाण्याची गरज असते. मका पीकही जोमात आहे. याशिवाय फळबागा व भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. अशा स्थितीत पिकांना सिंचनाची अत्यंत गरज असते. वेळेत परिपूर्ण सिंचन न झाल्यास पिकांना फटका बसतो आहे. उन्हाळ्यात अशी स्थिती कायम राहिल्यास पिके वाळण्याची चिन्हे असल्याने शेतकर्‍यांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत