शेतकर्‍यांच्या आर्थिक गणिताला फटका

    दिनांक :05-Apr-2024
Total Views |
तिरोडा,
FARMERS BILL आगामी खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खताच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. शेती उत्पादनासाठी रासायनिक खत अनिवार्य असल्याने शेतकर्‍यांच्या व्यवहारात रासायनिक खताच्या किमती महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात गेल्या काही वर्षांत सततची वाढच होत असल्याने शेतकर्‍यांचे अर्थशास्त्र बिघडत असल्याची स्थिती आहे. तालुक्यासह जिल्ह्यात खरिपाची पेरणी जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच खताची खरेदी होते. शिवाय उन्हाळी धान व ऊसासाठी बेसळ डोस देणे आवश्यक असल्याने खताची आतापासूनच मागणी होत आहे. मात्र मिश्रखते, सुपर, पोटॅश यांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकर्‍यांना अधिकचा आर्थिक भार पडणार आहे. धानाच्या शेतीसाठी एकरी तीन बॅग खताची आवश्यकता आहे. तर ऊस पिकासाठी किमान आठ ते दहा पोते खत लागते. डिझेलची दरवाढ झाल्याने ट्रॅक्टरमार्फत होणारी आंतरमशागतीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढणार आहे.
 

WEEW 
खर्च मात्र वाढतोय
FARMERS BILL खते, बियाणे, मजुरी, मशागतीसाठी लागणारे यंत्र याच्या बाजारभावात नियमित वाढच होत आहे. मात्र शेतमालाचे बाजारभाव स्थिर अन् घटतेच आहेत. गेल्या दोन वर्षापासून धानाचे बाजार भाव बाजारभाव दोन ते तीन हजाराभोवतीच आहेत. यंदाच्या खरे हंगामात पावसाचा खंड त्यानंतर अतिवृष्टी व पी खाती येत असताना झालेला अवकाळी पाऊस यामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली. याचा प्रभाव शासकीय धान खरेदीवरही दिसून आला. खरेदीचे उद्दिष्टही पूर्ण झाले नाही. त्यामुळे शासनाने दोनदा मुदतवाढ देऊनही उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. गतवर्षीपेक्षा यंदाच्या हंगामात 16 लाख क्विंटल कमी टन खरेदी झाली. शेतमालाचे बाजारभाव घटणारे अन् खर्च मात्र वाढतच असल्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे.  राज्यपाल पुरस्कारासाठी ‘प्रोग्रेसिव्ह’च्या 21 विद्यार्थ्यांची निवड