गतीचे गीत गाऊ... !

economy-rise-India जीडीपी ओलांडला विक्रमी टप्पा

    दिनांक :20-Nov-2023
Total Views |
अग्रलेख
economy-rise-India विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या मालिकेतील सातत्यपूर्ण विजयांचा आनंद मोठा की अंतिम सामन्यातील पराभवाचे दु:ख मोठे, या प्रश्नाच्या संभ्रमात सारा देश बुडालेला असतानाच, आनंदाला आणखी झळाळी देणारी एक बातमी भारताच्या अर्थविश्वाचे क्षितिज उजळून टाकणारी ठरली. economy-rise-India स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापासून शतक महोत्सवी वर्षाच्या अमृतकाळात यशाची प्रत्येक पायरी आत्मविश्वासाने पादाक्रांत करीत जगाच्या नकाशावर आपले अढळ आणि उच्च स्थान अधोरेखित करण्याच्या भारताच्या आत्मनिर्भर प्रयत्नांची फळे आता दिसू लागली आहेत. economy-rise-India उभा देश रविवारी जेव्हा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील थरारक संघर्षाचा अनुभव घेत होता, तेव्हाच भारताच्या अर्थविश्वाने जागतिक स्तरावरील आपल्या महत्त्वाकांक्षेच्या दिशेने पुढचे दमदार पाऊल टाकल्याची आनंदवार्ता झळकली. economy-rise-India भारत देश जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करू लागल्याचे स्पष्ट संकेत रविवारी जगाला दिले गेले आणि आनंदोत्सवास उधाण आले. असंख्य अडथळे, ७५ वर्षांच्या वाटचालीतील असंख्य संकटे झेलत भारताने यशाच्या दिशेने आत्मविश्वासाने सुरू ठेवलेल्या पावलांनी अखेर अपेक्षित शिखराचा टप्पा गाठण्यास सुरुवात केली आहे. economy-rise-India
 
 
 

economy-rise-India 
 
 
 
रविवारी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाने चार लाख कोटी डॉलर्सचा टप्पा ओलांडून जगातील भक्कम अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या रांगेत चौथे स्थान संपादन केल्याची बातमी अनेक राजकीय नेत्यांनी तसेच उद्योगविश्वाने आनंदाने जगासमोर ठेवली आणि येत्या दोन वर्षांत पाच लाख कोटींचे लक्ष्य गाठून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या स्वप्नाला बळकटी दिल्याचे जाहीर झाले. येत्या दोन वर्षांत, सन २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. economy-rise-India सत्तेवर आल्यापासून सातत्याने याच स्वप्नाचा ध्यास घेऊन त्यादृष्टीने पावले टाकणाऱ्या मोदी यांच्या राजवटीने या उद्दिष्टाआड आलेल्या कोरोनासारख्या महामारी संकटास जुमानले नाहीच; उलट त्याचे आव्हान झुगारून लावून अर्थव्यवस्थेचा वारू उधळता राहावा यासाठी सर्व शक्ती पणास लावली. देशाच्या विकासास दिशा देण्याकरिता जे जे आवश्यक, ते सारे मिळविण्याकरिता प्रतिष्ठा पणास लावली आणि जगाच्या पाठीवर भारताचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याकरिता प्रत्येक जागतिक मंचावर प्रचंड आत्मविश्वासाने भारताच्या महत्तेचे पोवाडे गायिले. विकासाच्या अथक वाटचालीसाठी नियोजित आखणी आवश्यक असते.
इथे वाचा कालचा अग्रलेख ...  विकसित भारताचा द़ृढ संकल्प
 
 
 
गेल्या नऊ वर्षांच्या सत्ताकाळात ‘सबका साथ, सबका विकास' हाच राष्ट्रनिर्मितीचा मूलमंत्र मानून विकासाच्या प्रकल्पांना चालना दिली गेली. विकासाची फळे देशातील अखेरच्या स्तरापर्यंतच्या प्रत्येकाच्या वाट्यास आली पाहिजेत यासाठी आग्रह धरला आणि त्याचा परिणाम सिद्ध झाला. economy-rise-India जीडीपीची चार लाख कोटी डॉलर्सपर्यंतची मजल हा काही चमत्कार नव्हे, तर या परिश्रमांचे फळ आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत शेती, हस्तव्यवसाय, उद्योगधंदे, उत्पादन, पायाभूत सुविधांचा विकास, विविध सेवाक्षेत्रांतील आधुनिकतेचा समावेश होता. गेल्या काही वर्षांत भारतातील संगणक तंत्रज्ञानाने प्रचंड मोठी झेप घेतली आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भविष्य घडविण्याची क्षमता असलेल्या भारतातील युवाशक्तीला जागतिक स्तरावरील असंख्य संधींचे दरवाजे खुले झाले. भारत हा गेल्या वर्षांत जगाला बाह्यस्रोतांद्वारे सेवा पुरविणारा देश म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू लागला आहे. economy-rise-India अतिकुशल तंत्रज्ञांचा सर्वात मोठा पुरवठादार म्हणून भारताने जगासमोर आपली नवी ओळख निर्माण केली आहेच; पण औषधनिर्माण, जैव तंत्रज्ञान, दूरसंचार, अंतरिक्ष तंत्रज्ञान, जहाज निर्मिती, विमान बांधणी, पर्यटन आदी विविध क्षेत्रांतली आपली क्षमतादेखील सिद्ध केली आहे.
 
 
 
इथे वाचा आधीचे अग्रलेख ...  जयशंकर यांचा खमकेपणा
 
 
 
शेकडो वर्षांच्या परकीय सत्तेच्या दबावाखाली राहिल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवरही या सत्तांच्या धोरणांचा परिणाम दिसून येत होता. तो पुसून भारताच्या जीवनशैलीशी, समाजव्यवस्थेशी निगडित आणि सामाजिक परंपरा आणि संस्कृतीशी नाते जोडणारी धोरणे राबविण्याचा अत्यंत धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतला. मोदी सरकारच्या निर्णयांना आणि धोरणांना भारतीय समाजव्यवस्थेशी नाते सांगणाèया एकात्म मानववादाच्या आणि अंत्योदयाच्या अस्सल भारतीय अशा अद्वितीय विचारांची बैठक असल्याने, अशा धोरणांचे परिणाम आता देशात दिसू लागले आहेत. economy-rise-India समाजाचा कोणताही घटक कोणत्याही विकासापासून वंचित न राहता, त्याला या विकासाची फळे चाखता यावीत, याची जबाबदारी घेऊन, प्रसंगी अशा वंचित घटकांच्या आधारासाठी सरकारच्या शिरावर जबाबदारी घेऊन अनेक योजना राबविल्या गेल्या; त्यांची कठोर अंमलबजावणी केली गेली आणि विकासाच्या आलेखाने अपेक्षित उंची गाठण्यास सुरुवात केली. चार लाख कोटींचे उद्दिष्ट गाठून चौथ्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था म्हणून देशाची मान अभिमानाने उंचावत असतानाही, या आकड्याविषयी साशंकता व्यक्त करण्याचे राजकारण काही काळ सुरू राहणार आहे.
 
 
economy-rise-India आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या हवाल्याने १८ नोव्हेंबर रोजी समाजमाध्यमांवर झळकलेल्या एका तक्त्याचा उल्लेख करून रविवारी अनेकांनी या बातमीचा पुरावा सादर केला आणि माध्यमांचे रकाने या बातमीने झळकले. देशाच्या अर्थ मंत्रालयाने qकवा अन्य संबंधित संस्थांनी त्यास अधिकृत दुजोरा दिला नसला, तरी हा आनंद आपोआप देशभर पाझरत गेला आणि काँग्रेसमध्ये पोटदुखीचा फैलाव सुरू झाला. देशाच्या अर्थव्यवस्थेने मजल मारल्याची आनंदवार्ता खोटी आणि बनावट असल्याची मळमळ या पक्षाच्या काही नेत्यांनी समाजमाध्यमी मंचांवरूनच व्यक्त करून टाकली. भारत ही क्रयशक्ती समानतेच्या संदर्भात जगातील तिसèया क्रमांकाची सर्वात मोठी आणि बाजार विनिमय दरानुसार पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरल्याचे संसदेच्या अधिकृत प्रकाशनांत गेल्या फेब्रुवारीतच स्पष्ट करण्यात आले आहे. economy-rise-India त्यामुळे या आकडेवारीवर बनावटगिरीचा शिक्का मारण्याचा विरोधकांचा प्रयत्न केवळ पोटदुखीतूनच असल्याचे स्पष्ट आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पृष्ठभूमीवर जगातील अनेक देशांत आर्थिक अस्थैर्याचे सावट पसरले आहे.
 
 
अनेक देशांत साधनसंपत्तीच्या उपलब्धतेच्या समस्या उग्र होऊ लागल्या आहेत, तरीही याही स्थितीत, भारताने मात्र विकासाचा वेग स्थिर राखण्यात यश संपादन केले आहे. २०२३ च्या वर्षात जगाच्या एक तृतीयांश भागात मंदीचे सावट दाटलेले राहील, असा दावा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केला होता. मंदीचे हे सावट दीर्घकाळ राहणार असल्याचे भाकीत जागतिक बँकेने जानेवारी २०२३ च्या प्रकाशनातून वर्तविले होते. economy-rise-India एकंदरीत जगात अनेक देशांतील सर्वच क्षेत्रांवर मंदीचे सावट असताना याच संस्थांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत मात्र आशादायक भाकिते वर्तविली होती. आर्थिक आणि राजनैतिक धोरणांच्या निश्चित आखणीखेरीज आणि भक्कम आत्मविश्वासाच्या पाठबळाखेरीज असे चित्र उभे राहू शकत नाही. डिजिटल प्लॅटफॉर्मचा विस्तार, पीएम गतिशक्ती योजनांच्या अंमलबजावणीचा निर्धार आणि नवनिर्माणातून उत्पादन क्षमतेस प्रोत्साहन देण्याचा आग्रह या त्रिसूत्रीमुळे आर्थिक विकासास वेग आला आणि मंदीच्या सावटाखाली जगाच्या नकाशावर भारताच्या विकासाचे चित्र अधिक तेजस्वी झाले.
 
 
economy-rise-India चीनसारख्या सशक्त अर्थव्यवस्थेसही कोविड काळात आरोग्य सेवा क्षेत्रातील कमकुवतपणाची जाणीव झाली आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. याउलट, भारताच्या ग्रामीण रोजगार हमी योजनेसारख्या योजनांनी ग्रामीण क्षेत्रात रोजगार निर्माण केले; त्यातून अप्रत्यक्षपणे ग्रामीण भारताच्या लोकसंख्येची आर्थिक स्थिती सुधारून क्रयशक्ती वाढल्याने उत्पादन क्षेत्रांस चालना मिळाली. पीएम किसान व पीएम गरीब कल्याण योजनांमुळे गरिबांच्या अन्नसुरक्षेबाबत निर्भरतेची हमी मिळाली. आता याची फळे दिसू लागली आहेत. economy-rise-India आता दुःख उधळण्यासाठी आसवांना वेळ नाही. केवळ गतीचे गीत गात पुढे चालायचे आहे आणि या आनंदवार्तेचा तोच संदेश आहे.