बुलढाणा

शहीद नितीन राठोड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बुलढाणा:शहीद जवान नितीन राठोड यांच्यावर चोरपांग्रा येथील गोवर्धन नगर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या साक्षीने शासकीय इतमामात आज, सायंकाळी 5.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रारंभी शहीद नितीन राठोड यांचे पार्थिव लोणार तालुक्यातील चोरपांग्रा येथे दाखल होताच नागरिकांनी फुलांचा वर्षाव केला. त्यानंतर पार्थिव शहीद नितीन राठोड यांच्या निवासस्थानी गोवर्धन नगर येथे आणण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदायांनी शहीद नितीन राठोड अमर रहे, पाकीस्तान मुर्दाबाद, वंदे मातर्म, भारत माता की जयच्या घोषणा

वाशीम

पुलवामा शहीदांच्या सन्मानार्थ दिडशे मिटरचा राष्ट्रध्वज घेऊन काढली रॅली - कडकडीत बंद पाळून केला हल्ल्याचा निषेध

मानोरा,पाकीस्तान समर्थीत आंतकवाद्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या बीएसएफ च्या जवानांच्या सन्मानार्थ आतंकवादी आणि त्यांच्या समर्थकांचा निषेध म्हणुन मानोरा शहर पुर्णपणे बंद ठेवण्यात आले. दिडशे मिटरचा राष्ट्रध्वज घेवून सर्वपक्षियांच्यावतिने रॅली काढण्यात आली. यावेळी वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषाने नगरी दुमदुमून गेली होती. या बंदमध्ये व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत शहीदांना श्रध्दांजली अर्पण करुन दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.   प्रारंभी मानोरा येथील झेंड

चंद्रपूर

वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू - ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना - घटनास्थळावर तणावपूर्ण स्थिती

चंद्रपूर,शेतकाम करीत असलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवार, रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा गावाजवळील पद्मापूर-बल्लारपूर येथे घडली. सुभद्रा गेडाम असे मृतक महिलेचे नाव आहे.    ब्र्रम्हपुरी तालुक्यातील हळदा परिसरात मागील काही दिवसांपासून वन्यप्राण्यांच्या हैदोसाने नागरिक भयभीत झाले आहेत. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी नुकतीच मानव हक्क परिषद घेवून शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. या परिसरातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसराती

महाराष्ट्र

शालेय अभ्यासक्रमात आत्मसंरक्षणाचा समावेश - महाराष्ट्र सरकारची योजना

मुंबई, आत्मसंरक्षणाच्या प्रशिक्षणाचा समावेश शालेय अभ्यासक‘मात समावेश करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. यासंदर्भात पुणे येथील मार्शल आर्टच्या महिला प्रशिक्षक नेहा श्रीमल यांनी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. या याचिकेला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हे आश्वासन दिले.      राज्यातील सर्वच शाळांमध्ये आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात यावे, अशी याचिका नेहा श्रीमल यांनी चेंज डॉट ओआरजी या संकेतस्थळावर मागील वर्षी सप्टेंबरमध्ये टाकली होती. या मागण

राष्ट्रीय

अजमेर दर्गा पाकिस्तानी लोकांसाठी बंद करा; दिवाण आबदिन यांची मागणी

अजमेर,  जम्मू काश्मीर येथील पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजस्थानातील अजमेर दर्ग्याची दारे पाकिस्तानी नागरिकांसाठी बंद करावीत, अशी सूचना दर्ग्याच्या प्रमुख दिवाणांनीच केली आहे.     पुलवामा दहशतवादी हल्ला हा इस्लामविरोधी आहे. त्यामुळे दरवर्षी पाकिस्तानातून अजमेर दर्ग्यात येणार्‍या मुस्लिम यात्रेकरूंवर निर्बंध आणावेत, अशी मागणी सय्यद जैन उल आबदिन यांनी केंद्राला केली. सर्व देशांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर बंदी आणावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.

आंतरराष्ट्रीय

भारताने डळमळू नये, ठोस कारवाई करावी; अमेरिकेतील 70 खासदारांची भूमिका

वॉशिंग्टन , पुलवामातील आत्मघाती हल्ला हा भारतावर आघातच आहे. या हल्ल्यामुळे भारताने कदापि डळमळू नये. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, दहशतवादविरोधात आता संपूर्ण निर्धाराने लढा द्या, अशी भूमिका अमेरिकेतील 70 पेक्षा जास्त खासदारांनी विशद केली आहे. यात 15 सिनेट सदस्यांचाही समावेश आहे.      भारत अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणारा देश नाही. अमेरिकन सरकार आणि येथील जनतेचा भारताला संपूर्ण पाठिंबा आहे. दहशतवाद्यांना सफाया करून, आपल्या लोकशाहीचे रक्षण करण्याच्या भारताच्या अधिकाराचेही आम्ह

अग्रलेख
क्रीडा

सलग दुसर्‍या वर्षी विदर्भाला इराणी करंडक- अथर्व, सतीशची अर्धशतकी खेळी- अक्षय कर्णेवार सामनावीर

नागपूर,सलग दुसर्‍यांदा रणजी करंडक िंजकणार्‍या विदर्भाने आता आपल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत सलग दुसर्‍यांदा इराणी करंडक िंजकला. सामन्याच्या पाचव्या व अखेरच्या दिवशी सामना अनिर्णित राहिला व रणजी विजेत्या विदर्भाने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर इराणी करंडक विजेतेपदावर आपले नाव कोरले.    शेष भारताने पहिल्या डावात 330 धावा काढल्या होत्या, प्रत्युत्तरात विदर्भाने अक्षय कर्णेवारच्या दमदार शतकाच्या जोरावर 425 धावा उभारल्या. शेष भारताने 3 बाद 374 धावांवर आपला दुसरा डाव घ

क्रीडा

सायनाचे जेतेपद कायम, सौरभ वर्माला तिसर्‍यांदा राष्ट्रीय जेतेपद- राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडिंमटन स्पर्धा

गुवाहाटी,फुलराणी सायना नेहवालने पुन्हा एकदा पी.व्ही. िंसधूवर 21-18, 21-15 असा विजय नोंदवून आपले महिला एकेरीचे राष्ट्रीय विजेतेपद कायम राखले आहे. सायनाने चौथ्यांदा राष्ट्रीय विजेतेपदाचा मान मिळविला. पुरुष गटात अनुभवी सौरभ वर्माने युवा सहकारी खेळाडू लक्ष्य सेनला तंत्रशुद्ध बॅडिंमटनचे धडे देत आपले तिसरे वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडिंमटन स्पर्धेचे अिंजक्यपद पटकावले.   सामन्याच्या प्रारंभी िंसधूने उत्कृष्ट खेळ करत 4-2 अशी आघाडी घेतली, परंतु सायनाने जोरदार मुसंडी मारत पहिल्या गेममध्ये 5-5, पुढे 9-9 अशी

व्हिडिओ

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस - तरुण भारत कॉन्क्लेव

Click for e-Paper

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

popular